हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तिसरा घोटाळा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात दुसऱ्या घोटाळ्याचे पुरावे ईडी कार्यालयात सादर केले.

मुश्रीफ यांनी शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची माय कमावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून त्या संदर्भात पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे.

याआधी किरिट सोमय्या यांनी कागलमधील सर सेनापती साखर कारखान्यात घोटाळ्या झाल्याचा आरोप करुन त्यासंदर्भातील कागदपत्र ईडीकडे दिली होती.

त्यानंतर आज त्यांना आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कागदपत्र सादर केली. या दोन्ही कारखान्यात हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केला आहे.

शेल कंपन्यांद्वारे म्हणजे ज्या कंपन्या अनेक वर्षांपूर्वी बंद झाल्या आहेत, त्याच्यात बोगस अकाउंट उघडायचं, त्यात पैसे टाकून कारखान्यात आले.

आप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स इंडियाला चालवायला दिला होता, इतकंच नाही तर राज्य सरकारकडूनही ब्रिक्स इंडियाला आणखी आर्थिक मदत करण्याचे आदेश देण्यात आले होते,

या सगळ्याचा सातबारा ईडीला दिल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स इंडिया ही हसन मुश्रीफ परिवाराची बेनामी कंपनी आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.