अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शेतकऱ्याचे अडीच एकर डाळिंबाच्या बागेला आग लागून बागेचे नुकसान झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील खर्डा भूम रस्त्यावरील शौकत शब्बीर शेख यांच्या डाळिंबाच्या बागेला अचानक आग लागून डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले.
तसेच पिकासाठी केलेल्या ठिबक सिंचनचे पाईप जळून नुकसान झाले. दरम्यान खर्डा येथील कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी यांनी केलेल्या जळीत फळबागेच्या केलेल्या पंचनाम्यात सुमारे ४ लाख ५८ हजार नुकसान झाले असल्याचा पंचनामा केला आहे.
आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. फळ बागेसह ठिबकच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शौकत शेख या शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे.