ताज्या बातम्या

Airtel : एक वर्षाची वैधता आणि दररोज 2GB डेटासह येतो ‘हा’ भन्नाट प्लॅन, मोफत मिळते OTT ची सुविधा

Published by
Ahmednagarlive24 Office

Airtel : एअरटेल ही देशातील सर्वात आघाडीच्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. इतर कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा या कंपनीचे प्लॅन ग्राहकांच्या बजेटमध्ये बसतात. त्यामुळे ग्राहकही एअरटेलला पसंती देतात.

ही कंपनी सतत ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारे आणि जिओ-वोडाफोन-बीएसएनएलला टक्कर देण्यासाठी भन्नाट प्लॅन लाँच करत असते. असाच एक एअरटेलचा प्लॅन आहे या प्लॅनमध्ये एक वर्षाची वैधता आणि दररोज 2GB डेटा त्याचबरोबर मोफत OTT ची सुविधा मिळते.

एअरटेलचा 2,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा हा रु. 2,999 रिचार्ज प्लॅन एका वर्षाच्या वैधतेसाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. इंटरनेट वापरासाठी प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो. यामध्ये मेसेजिंगसाठी दररोज 100 एसएमएसची सुविधाही उपलब्ध आहे. 2GB ची दैनिक मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64Kbps होतो.

एअरटेलच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनचे इतर फायदे

एअरटेलच्या या दीर्घ वैधता रिचार्ज प्लॅनमध्ये, तुम्हाला इंटरनेट डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह अनेक उत्तम फायदे मिळतात. या प्लॅन्समध्ये तुम्हाला Disney Plus Hotstar आणि Wynk Music अॅपचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.

एअरटेलच्या 2,999 रुपयांच्या या प्लॅनसह, मोबाईल एडिशन प्राइम व्हिडिओचे सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सस्ट्रीम मोबाइल सबस्क्रिप्शनही एका वर्षासाठी उपलब्ध आहे.

Airtel Xstream सह SonyLiv देखील जोडता येईल. हे ओटीटी प्लॅटफॉर्म एअरटेल अॅपच्या मदतीने पाहता येईल. या प्लॅनमध्ये तुम्हाला विंक म्युझिक अॅपवर मोफत गाणी ऐकण्याची सुविधा आणि मोफत हॅलो ट्यून्सचा लाभ मिळतो. यासोबतच या प्लानमध्ये Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.

Ahmednagarlive24 Office