Good News for Senior citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण आता या नागरिकांना एफडीवर वर 9.59 % पेक्षा जास्त व्याज देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना जास्त व्याज देत आहे. त्यामुळे या ग्राहकांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे ही संधी हातातून जाऊ देऊ नका.
बँकांनी आता सर्व कालावधीसाठी व्याजदर वाढवले असून बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींच्या व्याजदरासह सर्वसाधारण लोकांसाठी 4.00% ते 9.00% आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.50% ते 9.59% इतके व्याजदर देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आता आपल्या ग्राहकांना 7 ते 14 दिवसांत मुदत ठेवींवर 4.00% व्याजदर देत आहे. 15 ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींसाठी 4.25% व्याज दर तर 46 ते 90 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर आता 4.50% व्याजदर मिळत आहे, त्याचबरोबर आता 91 ते 6 महिन्यांच्या कालावधीतील मुदत ठेवींवर 5.00% व्याजदर दिले जाणार आहे.
त्याशिवाय आता 1 वर्ष ते 1 वर्ष आणि 6 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींवरील व्याज दर 7.00% इतके दिले जात आहे तर 1 वर्ष 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत मुदत ठेवींवरील व्याज दर 8.01% दिले जात आहे.
999 दिवसांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींवरील 8.51% व्याज दर आहे. 32 महिने, 27 दिवस ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर वाढून 7.25% झाला आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त परंतु पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 6.75% व्याजदर झाला आहे.
5 वर्षात परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 9% व्याजदर असेल, जो फक्त 15 दिवसांसाठी म्हणजे 6 डिसेंबर 2022 ते 20 डिसेंबर 2022 पर्यंतच ग्राह्य धरला जाणार आहे. 5 वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या ठेवींवरील व्याज दर 6.00% दराने 10 वर्षे असेल. तर ज्येष्ठ नागरिकांना इतर ग्राहकांपेक्षा 0.50% जास्त व्याज मिळेल.