गव्हासह तांदळाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या प्रत्येक गोष्टीतील महागाई वाढत चालली आहे. सध्या कांद्यानेही मोठे भाव गाठले आहेत. तसेच धान्याच्या बाबतीत गहू, तांदूळ यांच्या किमती देखील वाढल्या आहे. परंतु केंद्र सरकार ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असते.

याच पार्श्वभूमीवर गहू, तांदूळ यांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार गहू आणि तांदूळ या दोन्हींचे साप्ताहिक ई लिलाव आयोजित करत असते. नुकतीच ही ई-लिलाव प्रक्रिया 15 नोव्हेंबर 2023 रोजी झाली.

यावेळी खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत 2.84 लाख मेट्रिक टन गहू आणि 5830 टन तांदूळ विक्री करण्यात आली. यावेळी हा माल तब्बल 2334 बोलीदारांना विकला गेला. याच्या माध्यमातून वाढलेले भाव नियंत्रित करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.

किती रुपयांना झाली विक्री? :- या लिलावात या गव्हाची विक्री 2246.86 प्रति क़्विटल तर URS गव्हाची प्रति क़्विटल 2232.35 रुपयांना विक्री झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या लिलावात विकलेल्या तांदूळ,

गव्हाव्यतिरिक्त OMSS (D) अंतर्गत 2.5 लाख मेट्रिक टन गहू केंद्रीय भंडार/NCCF/NAFED सारख्या निम-शासकीय आणि सहकारी संस्थांना वाटप करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता मोठा बफर स्टॉक बाजार आल्याने किमती कमी होतील अशा अपेक्षा आहे.

पिठाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी ‘भारत आटा’ चे प्लॅनिंग :- गहू व पर्यायाने त्याच्या पिठाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी शासनाने आता ‘भारत आटा’ चे प्लॅनिंग केले आहे. गव्हापासून पीठ बनवण्यासाठी व ते कमी किमतीत वितरित करण्यासाठीच OMSS (D) अंतर्गत केंद्रीय भंडार, NCCF, NAFED सारख्या निमशासकीय आणि सहकारी संस्थांना 2.5 लाख टन गहू दिला गेला आहे.

विशेष म्हणजे या पिठाची किंमत प्रति किलो 27.50 रुपयांपेक्षा जास्त नसावी असाही शासनाने सांगितलं आहे. त्यामुळे आता हे विविध प्रकारांचे प्लॅनिंग व साठेबाजांवर सुरु असणारी कारवाई यामुळे लवकरच किमती नियंत्रणात येतील अशी अपेक्षा आहे.