Infrared Light : केवळ लाईटसाठी नव्हे तर रूम गरम करण्यासाठीही ‘या’ बल्बचा केला जातो वापर, किंमत आहे फक्त…

Infrared Light : सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे सगळीकडे रोज कडाक्याची थंडी अनुभवायला मिळते. या थंडीपासून वाचण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात.

काहीजण तर आपली खोली गरम करण्यासाठी रूम हीटर विकत घेतात. परंतु, याची किंमत खूप जास्त असते. मात्र तुम्ही आता एका बल्बमुळे खोली गरम करू शकता. विशेष म्हणजे या बल्बची किंमत 100 रुपयांपासून सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही यापूर्वी ऐकले नसेल कि एक बल्ब खोली गरम करू शकतो. परंतु, हा एक बल्ब इन्फ्रारेड बल्ब आहे. त्यामुळे तो संपूर्ण खोली गरम करतो. कमी किमतीत अनेक फायदे यामध्ये मिळतात.

तुम्हाला वाटेल हा तर हा साधा बल्ब आहे. परंतु हा साधा बॉब नाही याने खोली तर उजळून निघतेच पण याने खोली गरम होते. जाणून घेऊयात या बल्बची खासियत आणि किंमत

चीटिंग बल्ब

इन्फ्रारेड बल्बला त्याच्या फीचर्समुळे याला चीटिंग बल्ब असेही म्हणतात. यामागील मुख्य कारण म्हणजे इन्फ्रारेड बल्ब वापरल्याने जास्त उष्णता निर्माण होते. थंडीच्या दिवसात या बल्बचा वापर केला तर खोल्या गरम होतात.

खासियत

तुम्ही खोली गरम करण्यासाठी रूम हीटरचे नाव ऐकले असेल, त्याच प्रकारे हा बल्ब काम करतो. जर तुम्ही थंडीच्या दिवसात खोली गरम करण्यासाठी रूम हीटर वापरत असाल तर तुमच्याकडे आता आणखी एक पर्याय आहे. हा बल्ब इतर बल्बपेक्षा सर्वात जास्त उष्णता निर्माण करतो.

किंमत

जर तुमहाला हा बल्ब घ्यायचा असेल तर तो तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे घेऊ शकता. या बल्बची किंमत 100 ते 300 रुपयांपर्यंत असते. त्याचा रंग लाल असून तो सामान्य बल्बपेक्षा खूप वेगळा दिसतो.