MG Air EV Electric Car : भारतात इंधनाच्या किमती वाढल्यापासून इलेक्ट्रिक कारची क्रेझ तयार झाली आहे. भारतीय बाजारात लवकरच MG Air EV ही कार लाँच होणार आहे. ही कार लाँच झाल्यानंतर कहर करेल यात काही शंकाच नाही. जाणून घेऊयात या कारची लाँच तारीख आणि फीचर्स.
भारतीय मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ
केवळ इंडोनेशियामध्ये सध्या ही इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहे. लवकरच ही कार भारतात लाँच होईल. कंपनी पुढील काही महिन्यांत लाँच करण्याची दाट शक्यता आहे. रिपोर्टनुसार, भारतात ही कार पुढील वर्षी लॉन्च करू शकते. परंतु, याबाबत कोणतीही माहिती समोर अली नाही. मात्र या कारचे जबरदस्त फीचर्स समोर आले आहेत
फीचर्स
ही कार 3 मीटरपेक्षा कमी असेल. समोरच्या बाजूस एक LED स्ट्रिप असून जी त्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाईल. तसेच कारमध्ये 12 इंच स्टील व्हील असेल. मागे एक LED लाइट बार देखील असेल. त्याच्या केबिनमध्ये बराच आधुनिक टच दिला जाणार आहे. त्यामुळे आकर्षक लुक मिळत आहे.
बॅटरी : 25 kWh |
मोटर: 35-40 BHP |
चार्जिग टाइम: 5 तास |
रेंज: 300KM |
स्पीड: 90 KMPH |
सीट: 4 |
चार्जर: 6.6 kWh AC चार्जर |
लॉन्च: जनवरी 2023, संभावित |
किंमत: 10 लाख रुपये, संभावित |
किंमत
या कारचा 300 किलोमीटर रेंजचा दावा केला जात आहे. त्यामुळे याची किंमत 10 लाख रुपये असू शकते. ही आलिशान कार लॉन्च झाल्यानंतर ग्राहकांना ती खरेदी करू शकतात.