घरात सुख- शांती, उत्तम आरोग्य हवे असल्यास घराची मांडणी आणि बांधणी हे खूप महत्त्वाचे असते. घराचे बांधकाम करताना अनेकजण वास्तुविशारदाचा सल्ला घेत असतात.
परंतु त्यानंतर काही चुका घरात राहणाऱ्या व्यक्तींकडून होत असल्याने वास्तू व्यवस्थित राहूनही शांती आणि स्वास्थ लाभत नाही. त्यामुळे घरात राहणारे व्यक्ती सुखी राहत नाहीत.
घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा, आजारपण, गरिबी, नुकसान, अपयश येत असते. घरातील कोणत्याच कार्याला यश येत नाही.
यामुळे घरात दुख आणणारे, नकारात्मकता आणणारी गोष्ट याविषयी जाणून घेऊ. तुमच्याही घरात अशी वस्तू नाहीत ना याची माहिती करून घ्या.
घऱात तुटलेले ताट असणं खूप नुकसानकारक असते. घरात कोणतीच वस्तू तुटलेली नसावी. कधीच तुटलेली किंवा तडा गेलेले ताट नसावे.
अशा तुटलेल्या ताटातून जेवण केल्यास किंवा दुसऱ्याला दिल्यास घरातील सदस्यांवर कर्जाचे संकट येत असते. शिवाय घरात कोणते ना कोणते आर्थिक समस्या येत असतात.
(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)