देशातील ‘या’ मंदिरात आजच्या दिवसाला साजरा केला जातो ‘प्रजासत्ताक दिवस’

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- देशभरात 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, परंतु देशात एक मंदिर आहे जिथे आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.

नेमके काय आहे या मागील कारण? चला तर मग जाणून घेऊया… उज्जैनच्या बडा गणेश मंदिरात राष्ट्रीय सण इंग्रजी कॅलेंडरनुसार साजरे केले जात नाहीत, तर हिंदू कॅलेंडरच्या तारखेनुसार साजरे केले जातात.

त्यामुळे या मंदिरात आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी तिथीप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. उज्जैनचे बडा गणेश मंदिर हे देशातील एकमेव असे मंदिर आहे जिथे हिंदू दिनदर्शिकेनुसार सर्व राष्ट्रीय सण आणि उपवास साजरे केले जातात.

26 जानेवारी 1950 रोजी भारतात प्रजासत्ताकची स्थापना झाली होती. त्या दिवशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी होती.

त्यामुळे दरवर्षी उज्जैनच्या बडा गणेश मंदिरात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

आज (9 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता गणेश मंदिरात प्रजासत्ताक अखंडतेसाठी आणि राष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी देवाची पंचामृत अभिषेक-पूजा करण्यात आली आहे. तसेच 10 फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office