सरकारच्या या निर्णयाने ऑक्सिजनचा तुटवडा दूर होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- सध्या रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडतो आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यायत.

हीच गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारने ऑक्सिजन आयातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी ऑक्सिजन आयातीवरील बेसिक कस्टम ड्युटी म्हणजे आयात शुल्क आणि हेल्थ सेस पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयात शुल्क माफ करण्याची घोषणा ऑक्सिजनशी निगडीत उपकरणांवरदेखील लागू आहे. या निर्णयाला तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहे.

कोरोना महामारीशी संबंधित आढावा आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (24 एप्रिल) उच्चस्तरीय बैठक घेतली.

यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेताना आले. ऑक्सिजनच्या तसेच ऑक्सिजनशी संबंधित इतर उत्पादनांवरील आयातशुल्क माफ केल्यामुळे कोरोनाविरोधातील लढा सक्षमपणे राबवता येईल, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

तसेच,या निर्णयामुळे ऑक्सिजनची आयातसुद्धा वाढेल. तसेच त्याची किंमतसुद्धा कमी होईल, असंसुद्धा सरकारने म्हटलंय.

तसेच, ऑक्सिजन आणि इतर संबंधित वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये सीमाशुल्क विभागाकडून कोणताही दिरंगाई होऊ नये, याची काळजी महसूल विभागाने घेण्याच्या सूचनासुद्धा मोदी यांनी आजच्या बैठकीत केल्या आहेत.

या वैद्यकीय उपकरणांवर कस्टम ड्युटी माफ :-

  • मेडिकल ग्रेड ऑक्सिजन
  • ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटर, रेग्युलेटर कनेक्टर आणि ट्युबिंग
  • व्हीपीएसए आणि प्रेशर स्विंग अॅब्झॉर्पशन
  • ऑक्सिजन फिलिंग सिस्टम
  • ऑक्सिजन कनेक्टर
  • ऑक्सिजन स्टोरेज टॅंक,ऑक्सिजन सिलिंडर
  • ऑक्सिजन जनरेटर
  • आयएसओ कंटेनर्स आणि शिपिंग ऑक्सिजन
  • क्रायोजेनिक रोड ट्रान्सपोर्ट टॅक्स फॉर ऑक्सिजन
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24