अबू सालेमला कधी सोडायचे? सुप्रिम कोर्टाने दिला हा निर्णय

Maharashtra news:१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम याच्या शिक्षेसंबंधी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. केंद्र सरकारने पोर्तुगालला दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे.

त्यामुळे २५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर २०२७ नंतर त्याला तुरुंगात ठेवता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.अबू सालेमला २ प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पोर्तुगालकडून प्रत्यार्पण करते वेळी ज्या अटी भारताने मान्य केल्या होत्या त्यानुसार २५ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होऊ शकत नाही. त्यामुळे २०२७ मध्ये सुटका करावी अशी मागणी केली होती.अबु सालेमला २००५ मध्ये पोर्तुगालमधून भारतात आणलं होतं.

मुंबईच्या विशेष टाडा न्यायालयाने त्याला १९९३ च्या बॉम्ब स्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.यावर कोर्टाने म्हटले आहे की, पोर्तुगालला दिलेले आश्वासन पूर्ण करावे लागेल.२५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर केंद्राने यासंदर्भात राष्ट्रपतींना अबू सालेमच्या सुटकेसाठी सल्ला द्यावा.त्याला २०२७ च्या पुढे कैदेत ठेवता येणार नाही.