Electric Two Wheelers : लवकरच ऑटो एक्स्पो 2023 ला सुरुवात होणार आहे. यामध्ये अनेक दिग्ग्ज कंपन्या आपली वाहने सादर करणार आहे. एकीकडे देशात इंधनाच्या किमती वाढत चालल्या आहेत.
तर दुसरीकडे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात करत आहेत. अशातच आता या एक्सपो दरम्यान अनेक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर सादर करणार आहेत. पाहुयात सविस्तर
1. एलएमएल स्टार
LML पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत कमबॅक करत असून कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर स्टार ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाऊ शकते. यासोबतच कंपनी एक्सपोमध्ये मूनशॉट इलेक्ट्रिक बाइकही सादर करू शकते.
मूनशॉटमध्ये दोन पॉवर मोड आढळू शकतात, ज्यांना सर्ज आणि सिटी असे नाव कंपनीने दिले आहे. कंपनीची ही इलेक्ट्रिक बाइक 70 किलोमीटरची रेंज देऊ शकते. कंपनीने आधीच इलेक्ट्रिक स्कूटर स्टारचे बुकिंग सुरू केले आहे असून लॉन्चच्या वेळी तिची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते.
2. अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह
देशातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक बाइक F77 नुकतीच अल्ट्राव्हायोलेटने सादर केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी ऑटो एक्सपो 2023 मध्ये ही बाइक शोकेस करू शकते. बाईक बॅटरीच्या एकूण दोन प्रकारांसह येते, ज्यामध्ये 206-307 किलोमीटरची रेंज उपलब्ध असून F77 बेसिक व्हेरियंटमध्ये 85 Nm टॉर्कसह 36.2 bhp देते.
रेकॉन बाईक 38.8 bhp आणि 95 न्यूटन मीटर टॉर्क मिळवते. तर टॉप व्हेरियंट लिमिटेडमध्ये, बाइकला 40.5 हॉर्सपॉवरसह 100 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. बाईकची एक्स-शोरूम किंमत 3.80 लाख ते 4.55 लाख रुपये इतकी आहे.
3. मॅटर एनर्जी
नवीन इलेक्ट्रिक बाइक कंपनीने काही काळापूर्वी सादर केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी ऑटो एक्सपोमध्ये बाइकची किंमत आणि नावासह इतर माहिती शेअर करण्याची शक्यता आहे. कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक बाईकमध्ये फोर-स्पीड गिअरबॉक्स आहे आणि ABS सह येणारी बाईक 125 ते 150 किमीची रेंज मिळते.
4. टॉर्क मोटर्स
टॉर्क मोटर्सतर्फे ऑटो एक्स्पोमध्ये नवीन पिढीची बाइक सादर केली जाण्याची शक्यता आहे. एका रिपोर्ट्सनुसार, कंपनीची नवीन बाईक पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. यासोबतच यामध्ये चांगली बॅटरी आणि मोटर दिली जाऊ शकते, ज्यामुळे बाइकला अधिक पॉवर आणि चांगली रेंज मिळेल. यासोबतच नवीन बाईकमध्ये काही कॉस्मेटिक बदल दिले जाण्याची दाट शक्यता आहे.