महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील 60 केंद्रावर होणार ‘ही’ परिक्षा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील ६० केंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा आज सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत व तहसीलदार माधुरी आंधळे हे काम पहात आहेत. सदर परीक्षेसाठी अहमदनगर जिल्हा केंद्रावर एकूण १९ हजार १५२ उमेदवार परीक्षेस बसलेले आहेत.

शहरातील ६० उपकेंद्रांवर उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सदर परीक्षेसाठी समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संवर्गातील १५ अधिकाऱ्यांची तसेच भरारीपथक अधिकारी म्हणून तीन उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी व उमेदवारांनी कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे, तसेच मास्क, हातमोजे व सॅनिटायझर जवळ बाळगणे अनिवार्य आहे.

सदर परीक्षेकरीता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परीसरातील एसटीडी बुथ,फॅक्स, झेरॉक्स,

दुकाने बंद ठेवणेकामी परीक्षेच्या दिवशी सकळी ९ वाजेपासून दुपारी ४ वाजेपावेतो परीक्षा क्षेत्रामध्ये सीआरपीसी १९७३ चे कलम १४४ (३) लागु करणेत आलेले आहेत.