अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील सर्व सामान्य शेतकरी आप्पासाहेब काशिनाथ हापसे यांनी दोन एकर ऊसाच्या खोडव्यात तब्बल सातप्रकारची विविध पिके आंतरपीक म्हणून घेतले आहे.
आप्पासाहेब हापसे यांना जेमतेम अडीच एकर शेती. शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक वर्षापासून ते पशूपालन करताय.त्यासाठी अर्धा एकर क्षेत्रात चारा (घास, गिन्नी गवत) पीक आहे.दोन एकर ऊसाचा खोडवा राखला.
यापूर्वी सुरू उसात (लागणीत) गहू,कोबी,मका हे पीक आंतरपीक म्हणून अनेक वेळा घेतले. यंदा मात्र तब्बल सात प्रकारचे आंतरपीक म्हणून काकडी, गवार,पालक भाजी, मुळा, कोथिंबीर मेथी भाजी, कोबी यासह मका हे आंतरपीकं त्यांनी घेतले आहे.
मुख्यपिक असलेल्या ऊस पिकाची वाढ अतिशय जोमात आहे.कोरोनामुळे पुरेसा वेळ आहे.त्यामुळे खुरपणी वरच्यावर सुरू असल्याने ऊसासह सर्व आंतरपीकं जोमात आहे. किड रोखण्याच्या फवारणी व्यतिरिक्त गवताचा एकही फवारा नाही.
खुरपणीचा दुहेरी फायदा जनावरांना गवत म्हणून चाराही होतोय.पालक,काकडीची काढणी पंधरा तीन दिवसापासून सुरू झाली आहे. गवारही आठ दिवसापासून निघायला सुरुवात झाली.कोबी आगामी दहा- बारा दिवसात एकाच वेळी निघेल.
दरम्यान मका एकाच वेळी तोडून मूरघास तयार करण्याच्या विचारात हापसे आहेत. कोथिंबीर, मेथी भाजी आठ दिवसात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
कोरोनामुळे आठवडे बाजार बंद असला तरी हात विक्री करण्यास सोपे जाते.सात आंतरपीक ऐवजी एकच पीक असते तरएवढा माल एकाच वेळी विकणे कठीण झाले असते. सर्व थोडे-थोडे असल्याने विकणे शक्य आहे,असे हापसे म्हणाले.