अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहरात संघटीत गुन्हे करणार्‍या नालेगावच्या दातरंगे टोळीला जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले.याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेश काढला आहे.

टोळीप्रमुख अतुल रावसाहेब दातरंगे (वय 28), त्याचा भाऊ दिनेश रावसाहेब दातरंगे (वय 32 दोघे रा. टांगेगल्ली, नालेगाव) व बाबासाहेब सिताराम दातरंगे (वय 45 रा. गाडगीळ पटांगण, बोरूडे गल्ली) यांचा हद्दपारीमध्ये समावेश आहे.

दातरंगे टोळीविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात संघटीतपणे दरोडा घालणे, गंभीर दुखापत करणे, चोरी, घातक हत्याराने वार करणे, शस्त्र बाळगुन दहशत निर्माण करणे,

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करणे अशा गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. दातरंगे टोळीची कोतवाली पोलीस ठाणे हद्द तसेच नगर शहरातील दहशत कमी करण्यासाठी कोतवाली पोलिसांनी दोन वर्ष हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला.

सदरचा प्रस्ताव 12 ऑगस्ट 2020 रोजी अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर अधीक्षक पाटील यांनी निर्णय घेत दातरंगे टोळीला जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24