अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, करंजी, तिसगाव पाठोपाठ मिरी गावातदेखील कोरोना रुग्ण वाढत असल्याने ग्रामपंचायतने सोमवारपासून पुढील चार दिवस जनता कफ्र्यू लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच कमल सोलाट व उपसरपंच अरुण बनकर यांनी दिली.
मिरी येथेदेखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामपंचायतने चार दिवसांचा जनता कफ्र्यू लावण्याचा निर्णय घेतला असून,
कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी व रुग्णसंख्येत आणखी वाढ होऊ नये म्हणून गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पुढील चार दिवस बंद राहणार असल्याची माहिती सरपंच कमल सोलाट, उपसरपंच अरुण बनकर, ग्रामसेवक राजेंद्र साखरे यांनी दिली.