अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. बडे बडे देश कोरोनाने मोडकळीस आले आहे. परंतु जपान या सर्वांपासून अगदी बाजूला आहे. जपानमध्ये केवळ १६ हजार 804 प्रकरणं असून 886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
१४ हजार 406 रुग्ण बरे झाले असून अडीच हजारपेक्षाही कमी सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. या ठिकाणी कोणतेही लॉकडाऊन झाले नाही तसेच टेस्टही घेण्यात आल्या नाहीत तरीही या देशाचं रक्षण झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, जपानमध्ये संक्रमण अपेक्षेपेक्षा कमी पसरणं यामागे मोठं कारण आहे ते म्हणजे जापनीज लोकांना दैनंदिन आयुष्यात सातत्याने मास्क घालण्याची सवय आहे.
जपानमध्ये बहुतेक लोक पराग कणांच्या अॅलर्जीपासून वाचण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच वसंत ऋतूपर्यंत मास्क घालतात. शिवाय इन्फ्ल्यूएंझापासून बचाव करण्यासाठीदेखील काही लोकं नियमित मास्क वापरतात.
एकिकडे अमेरिकेत मास्कला तितकं प्राधान्य दिलं जात नाही तर दुसरीकडे याच मास्कमुळे जपान कोरोनाविरोधातील लढा जिंकत आहे. एक्सपर्ट पॅनेलचे उपाध्यक्ष आणि महासाथीचे तज्ज्ञ शिगेरू ओमी यांच्या मते,
जपानमध्ये या जागतिक महासाथीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरलं कारण इथली लोकं आरोग्य प्रती जागरूक आहेत. म्हणजे या लोकांनी पूर्णपणे खबरदारी घेतली.
हात धुण्यापासून ते सार्वजनिक स्वच्छतेच्या प्रत्येक निर्देशाचं या देशातील नागरिकांनी पालन केलं.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews