मुकेश अंबानींनी केली ही महत्वाची घोषणा …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी भारतात JioPhone Next ची घोषणा केली आहे.

जियो फोन नेक्स्ट हा फक्त भारतातीलच नव्हे, तर जगात सर्वात स्वस्त फोन असेल, असा दावा वार्षिक सभेदरम्यान या फोनची घोषणा करताना मुकेश अंबानी यांनी केला आहे.

भारताला टूजी मुक्त करायचं असेल, तर सर्वांना परवडेल अशा खऱ्या अर्थाने स्वस्त स्मार्टफोनची गरज आहे.

त्या आधारावर जिओ आणि गुगल यानी मिळून जिओ फोन नेक्स्ट डेव्हलप केला असून भारतात तो लाँच केला जाणार आहे, असं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.

खास भारतीय बाजारपेठेसाठी गुगल आणि जिओनं संयुक्तपणे हा फोन विकसित केला असून इतर स्मार्टफोन फीचर्सप्रमाणेच या फोनमध्ये अनेक फीचर्स असणार आहेत, अशी माहिती यावेळी मुकेश अंबानी यांनी दिली.

दरम्यान, या फोनची किंमत एजीएममध्ये जाहीर करण्यात आली नसून लवकरच ती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या नव्या फोनची किंमत जरी जाहीर करण्यात आली नसली, तरी हा फोन या वर्षी १० सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँच केला जाईल, असं मुकेश अंबानी यांनी यावेळी जाहीर केलं.

अहमदनगर लाईव्ह 24