जिल्ह्यातील हे महत्वाचे तीर्थक्षेत्र बंद राहणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. फेब्रुवारीपर्यंत हळूहळू कमी होणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत वाढू लागली आहे.

यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यामुळे अनेक तालुक्यात परिस्थिती देखील हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातच जिल्ह्यातील एका तीर्थक्षेत्राबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी पुन्हा एक वर्षानंतर आजपासून श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या वतीने भगवान दत्तात्रयांचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले.

संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे, इतर दूकाने बंद ठेवलेली आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर हे रुग्ण संख्या कमी होत नाही तोपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतलेला आहे.

दरम्यान मंदिरातील नित्यपूजा, आरती ही नियमित सुरु राहील. परंतु बाहेरगावाहून आलेल्या यात्रेकरू पर्यटक दर्शनार्थींसाठी मात्र मंदिर दर्शनासाठी खुले असणार नाही.

भगवान दत्तात्रय मंदिर, पंचमुखी सिद्धेश्वर मंदिर, श्रीसमर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा समाधी मंदिर ही देवालये बंद असतील. प्रवरापात्रात नौकाविहार तसेच परिसरात असणारी छोटी हॉटेल्स, प्रसादालय, दुकाने हेही बंद असतील,

रुग्णसंख्या कमी झाल्या नंतर नेहमीप्रमाणे मंदिर परिसर हा पूर्ववत सुरू केला जाईल, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी जनतेस केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24