कोरोना संकटात मोदी सरकारने घेतला हा मोठा निर्णय !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- खातेवाटप झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय कोरोना आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत.

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी २३ हजार १०० कोटी रुपयांच्या आपत्कालीन आरोग्य पॅकेजची घोषणा करण्यात आला आहे. याशिवाय एक लाख कोटी रुपये मंडयांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील.

कोरोनाचं संकट पाहता आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती नवनियुक्त आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. ‘तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी केली जात आहे.

२० हजार नवे आयसीयू बेड तयार करण्यात येत आहेत. कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी २३१०० कोटी रुपयांचं आपत्कालीन हेल्थ पॅकेज तयार करण्यात आलं आहे,’ असं मंडाविया यांनी सांगितलं.

‘जिल्हा स्तरावर एक कोटी औषधं उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळता येईल. केंद्र आणि राज्य सरकारं मिळून कोरोना संकटाचा मुकाबला करतील,’ अशी माहिती मंडाविया यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24