अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. यातच ज्येष्ठनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रकरणावरून मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही. मग सत्य बाहेर कसे येणार? असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
या प्रकरणात गुंतलेल्या डागी मंत्र्याना तातडीने बडतर्फ करा, अशी मागणीही त्यांनी केली. खासगी कार्यक्रमानिमित्त येथे आले असताना विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर परखड भाष्य करताना ते म्हणाले, “”सरकारने या घटनेत गांभीर्य दाखविलेले नाही. घटनेत गुंतलेले मंत्री अजूनही गायब आहेत. या घटनेतील सत्य समोर यावे, असे मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असले, तरी अद्याप गुन्हाच दाखल झालेला नाही.
त्यामुळे सत्यता कशी बाहेर येणार? मागील वेळीही राष्ट्रवादीचे मंत्री अशाच घटनेत अडकल्यानंतर काय झाले, हे संपूर्ण राज्याने पाहिले. त्यामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार असल्याचा संदेश राज्यात जात असल्याचे भान महाविकास आघाडी सरकारने ठेवले पाहिजे.
” ही घटना सरकारने गांभीर्याने घेतलेली नाही. घटनेत गुंतलेले मंत्री अजून गायब आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री अशाच घटनेत अडकल्यानंतर काय झाले, हे राज्याने पाहिले.