भाजपचे नेते बिथरल्याचं हे लक्षण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या कंपनीच्या संचालकाला चौकशीसाठी बोलावलं, पण त्यानं उडवाउडवी केली.

दोन दिवसांनी तो आला. पोलिस एखाद्याला चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत का? एका व्यावसायिकासाठी विरोधी पक्षाचे नेते पोलिसांवर दबाव आणतात हे आश्चर्यकारक आहे. भाजपचे नेते बिथरल्याचं हे लक्षण, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आहे.

असं असताना ब्रुक फार्मा कंपनीकडे सुमारे २० लाख रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या कंपनीच्या मालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

हे कळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे भाजपच्या काही नेत्यांसह थेट पोलीस ठाण्यात पोहोचले होते. भाजप नेत्यांच्या या वर्तनावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली.

कोरोना महामारीमध्ये रेमडेसिविरची प्रचंड कमतरता असताना पोलिसांकडून काय अपेक्षा असेल? चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत का? भाजप नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का?,’ असा सवाल सावंत यांनी केला आहे.

‘आपलं कर्तव्य तत्परतेनं बजावणारे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे आणि टीमचं त्यांनी अभिनंदनही केलं आहे. एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव आणणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते.

पोलिसांचा दोष काय? रेमडेसीवीरच्या ६०,००० इंजेक्शनचा मोठा साठा ब्रुक्स लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे. त्याबाबतची माहिती दडवण्यात आली आहे, असं पोलिसांना कळलं होतं.

निर्यात बंदी झाल्यावर कंपनीनं CDSCO ला आणि राज्य FDA ला साठ्याची माहिती देणं आवश्यक होतं. त्याच अनुषंगानं मुंबई पोलिसांनी कंपनीच्या संचालकाला चौकशीसाठी बोलावलं, पण त्यानं उडवाउडवी केली.

दोन दिवसांनी तो आला. परंतु त्याच्या मदतीला स्वतः फडणवीस रात्रीच्या वेळी धावले. भाजपचे नेते बिथरल्याचं हे लक्षण आहे,असेही सावंत यांनी म्हटलं आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24