दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी शासनाने राज्यात अनेक कठोर निर्बंध लागू केलेले आहे.

यातच खासगी कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले आहे. यातच आता शासनाने राज्यातील दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना ही केवळ पंधरा टक्के उपस्थिती निश्चित केली आहे.

मात्र आता धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय विभागाने एक अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांना कार्यालयात उपस्थित राहन्यामध्ये सूट देण्यात आली आहे.

त्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संबंधित विभागातर्फे केला जाणार आहे. याबाबतची माहिती स्वतः सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिलेली आहे.

दिव्यांग व्यक्तीचे आरोग्य आणि इतर सुविधांचा विचार करून त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यासंबंधीच्या शासन आदेश देखील त्यांनी पोस्ट केला आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी 15% उपस्थिती निश्चित केलेली आहे,

दिव्यांग व्यक्तींचे आरोग्य व अन्य सुविधांचा विचार करून दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा संबंधित विभाग करून देतील.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24