याला म्हणतात परतावा ! ‘या’ स्टॉकने फक्त 4 महिन्यात गुंतवणूकदारांना दिला 585 टक्क्यांचा परतावा, गुंतवणूकदार बनलेत मालामाल

Published by
Ahmednagarlive24 Office

Multibagger Stock : शेअर बाजार गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी खूपच स्पेशल राहणार आहे. खरे तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

दीर्घ कालावधीसाठी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. अनेक प्रसंगी असेच आढळून आले आहे. गुंतवणूकदारांनी जर एखादा योग्य स्टॉक निवडला आणि त्यामध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर त्यांना चांगले रिटर्न मिळतात यात शंकाच नाही.

मात्र शेअर बाजारात असेही काही स्टॉक आहेत जे अल्पावधीतच गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. दरम्यान बाजारात अलीकडेच लिस्टेड झालेल्या एका स्टॉकने अशीच किमया केली आहे. या स्टॉकने मात्र चार महिन्यांच्या काळात गुंतवणूकदारांना तब्बल 585 टक्क्यांचा परतावा देण्याची किमया साधली आहे. यामुळे गुंतवणूकदार अवघ्या काही महिन्यातच मालामाल झाले आहेत.

कोणता आहे तो स्टॉक

मेसॉन वाल्वच्या शेअर्सने ही किमया साधली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीचा आयपीओ चार महिन्यांपूर्वी 102 रुपयांच्या किमतीत शेअर बाजारात दाखल झाला होता. आता मात्र या कंपनीचे शेअर 705.25 रुपयांवर पोहोचले आहेत.

म्हणजेच अवघ्या चार महिन्यांच्या काळात या स्टॉक ने 585 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. काल या कंपनीचे स्टॉक 716 वर पोहोचले होते. हा स्टॉक चा 52 आठवड्याचा हाय लेवल आहे. स्टॉकचा 52 आठवल्यांचा लो लेवल 193.80 रुपये एवढा आहे.

दरम्यान काल बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे स्टॉक 705.25 रुपयांवर आलेत. यामुळे ज्यावेळी कंपनीचा आयपीओ आला त्यावेळी ज्या गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली आहे त्यांना अल्पकालावधीत चांगला बंपर परतावा मिळाला आहे.

यामुळे गुंतवणूकदारांची खऱ्या अर्थाने चांदी झाली आहे. खरे तर शेअर बाजारात चढ-उतार सुरू असते यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञ लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Ahmednagarlive24 Office