अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-शिर्डी नगरपंचायतची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विरोधक राजकारण करत आहेत. कोरोना संकटात लोकांच्या आरोग्याशी खेळणे योग्य नाही.
विरोधकांनी निवडणुकीच्या काळात राजकारण करावे, ही राजकारण करण्याची ही वेळ नाही, असा सल्ला नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिला आहे.
नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी पत्रकात विरोधकांना चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटले, की जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साईसंस्थानच्या वतीने शिर्डीत कोविड सेंटर चालु आहे. पूर्ण जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनची यादी प्रसिद्ध झाली.
त्यात राहता तालुक्यातील नावे असलेले तीन नंबरचे पान प्रकाशीत झाले नव्हते. कुठल्याही मुदयावर राजकारण आता सुरु झाले.
त्याचे कारण आगामी नगरपंचायत निवडणुक आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणे बरोबर नाही. राहाता तालुक्यातील यादीत शिर्डी व राहाता मेडीकलची नावे आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या यादीत सर्वांना कुठलेही राजकारण नाही. विरोधकांनी निवडणुकीच्या काळात राजकारण करावे. ही राजकारण करण्याची वेळ नाही, असा सल्ला गोंदकर यांनी दिला.