Jio vs Airtel vs Vi : रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या खूप आहे.
अशातच अनेकांना कोणत्या कंपनीचा रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त आहे असा प्रश्न पडतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल किंवा पडत असेल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
Jio Plan
हा प्लॅन 23 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 1.5GB डेटा आणि 100 एसएमएस प्रतिदिन देत आहे. अनलिमिटेड कॉलसह हा प्लॅन Jio अॅप्सची विनामूल्य सदस्यता देते.
179 रुपयांचा प्लॅन-
हा प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसह येतो यामध्ये दररोज 1GB डेटा आणि प्रतिदिन 100 एसएमएस मिळतात. त्याशिवाय Jio अॅप्सच्या सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग मिळतात.
149 रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन 20 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 1GB डेटा आणि 100 SMS चा लाभ घेता येतो. वापरकर्त्यांना Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जाते.
119 रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 1.5GB डेटा आणि 300 एसएमएस चा फायदा घेता योतो. त्याशिवाय Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
Airtel Plan
179 रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएससह 2GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये मोफत हेलोट्यून्स आणि मोफत विंक म्युझिक सबस्क्रिप्शन मिळते.
155 रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये 1GB डेटासह अमर्यादित कॉल आणि 300SMS चा लाभ घेता येतो. प्लॅन विनामूल्य हेलोट्यून्स आणि विनामूल्य विंक म्युझिक सबस्क्रिप्शन मिळते.
Vi Plan
199 रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन 18 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 1GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळतात. प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
179 रुपयांचा प्लॅन- हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये 2GB डेटासह 300SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळतात. त्याशिवाय Vi Movies आणि TV चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.