कमाल 320 किमी प्रतितास वेगाने अरबी समुद्राखालून धावणार भारतातील ‘ही’ पहिली ट्रेन! जगात कुठे कुठे धावतात पाण्याखालून ट्रेन?

Published by
Ajay Patil

भारतामध्ये सध्या परिस्थितीत आपण जर मागील काही वर्षांपासून पाहिले तर विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले जे काही पायाभूत प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून या प्रकल्पांच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीत भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनाला याचा खूप मोठा हातभार लागणार आहे.

कुठल्याही देशाच्या विकासामध्ये वाहतूक आणि दळणवळणाच्या प्रगत सोयीसुविधाना खूप मोठे महत्त्व असते. याच अनुषंगाने भारतात अनेक मोठमोठे अशा रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेतच व सोबतच मेट्रो तसेच रेल्वे व बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प देखील भारतामध्ये पूर्णत्वास येत आहे.

रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांमुळे भारतातील महत्त्वाच्या शहरांमधील आणि राज्य राज्यांमधील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल व याचा थेट उपयोग हा कृषी आणि औद्योगिक व इतर क्षेत्रांच्या विकासाला होईल.

या सगळ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये जर आपण भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल बघितले तर हा मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर उभारण्यात येत असून हा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

याच प्रकल्पाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील असा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे की यादरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन अरबी समुद्राच्या खालून धावणार आहे.

 देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार समुद्राखालून

भारतातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. ही बुलेट ट्रेन कमाल ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणार असून याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही देशातील पहिली बुलेट ट्रेन असणार आहे जी समुद्राच्या खालून धावणार आहे.

जवळपास अरबी समुद्राच्या खालून ही ट्रेन 21 km लांबीचे अंतर एका बोगद्यातून पार करणार आहे. या ट्रेनचा वेग पाहिला तर मुंबई अहमदाबाद हे पाचशे आठ किलोमीटरचे नंतर असून हे अंतर कापण्यासाठी या ट्रेनला दोन तास सात मिनिटे लागणार आहेत.

परिपूर्ण सोयी सुविधानीं युक्त असलेली ही ट्रेन प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. भारतातील ही पहिली समुद्राखालून धावणारी बुलेट ट्रेन असली तरी भारतात या आधी देखील एक मेट्रो जी पाण्याखालून धावते व जगात देखील असे अनेक ट्रेन आहेत की त्यांचा मार्ग पाण्याखालून आहे.

 भारतातील जगातील पाण्याखालून धावणाऱ्या ट्रेन

1- भारतातील पहिली अंडरवाटर ट्रेन या आधी जर आपण भारतातील पहिली अंडरवॉटर ट्रेन बघितली तर ती कोलकत्यात असून ती मेट्रो आहे. कोलकत्यात धावणारी ही मेट्रो हुगळी नदीच्या खालून हावडा पर्यंत धावते.

2- लंडनफ्रान्स युरोस्टार ट्रेन ही देखील पाण्याखालून धावणारे ट्रेन असून ती लंडन आणि फ्रान्स दरम्यान धावते. ही हायस्पीड युरो स्टार ट्रेन पाण्याखाली 31 मैल अंतर कापते व ही ट्रेन इंग्लिश खाडी मार्गे लंडनहुन पॅरिसला दोन तास 35 मिनिटात पोहोचते. 18 बोगींची ही ट्रेन आहे.

3- जपानच्या सिकान टनेलमधून धावणारी ट्रेन जपानमध्ये देखील पाण्याखाली रेल्वे चालवण्यात येते व ही रेल्वे जपानच्या सिकाल टनेलमधून धावते व होक्काइडो आणि आओमोरीला जोडते.

4- स्वित्झरलँड मधील धावणारी ट्रेन पाण्याखालून धावणाऱ्या ट्रेनच्या बाबतीत स्वित्झर्लंड देखील मागे नसून या ठिकाणी गॉटहार्ड बेस टनेल झुरीचला मिलान शहराशी जोडण्याचे महत्वपूर्ण काम या ट्रेनच्या माध्यमातून होते. या अंतरामध्ये 57 किलोमीटरचा बोगदा ट्रेनला पार करावा लागतो व त्यासाठी वीस मिनिटांचा कालावधी लागतो.

5- तुर्कीये मधील मार्मरे बोगदा तुर्कीये येथील बोसफोरस सामुद्रधुनीखालील 13.5 किमी लांबीच्या बोगद्यातून या ठिकाणी ट्रेन धावते व या बोगद्यालाच मार्मरे बोगदा असे म्हणतात.

6- ट्रान्सबे ट्यूब( कॅलिफोर्निया)- कॅलिफोर्नियातील सॅन्फ्रान्सिको आणि ऑकलंड या शहरांमध्ये ट्रान्सबे ट्यूब ही ट्रेन धावते. या दोन शहरांमध्ये पाण्याच्या खाली असलेल्या बोगद्यातून ही ट्रेन धावते.

Ajay Patil