या आमदाराचा ‘सिव्हिल’ला सुपर स्पेशालिटी बनविण्याचा मानस!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून एक आरोग्य मंदिर उभे करायचे आहे. या माध्यमातून एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार.

कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये अभिमानाची एक बाब म्हणजे आरोग्य सेवेमध्ये सरकारी यंत्रणा सर्वात आधी पुढे आली, यात जिल्हा रुग्णालयाचे काम कौतुकास्पद आहे.

असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. जिल्हा शासकीय रक्तपेढीला भारतात निती आयोगाचा प्रथम मानांकन मिळाल्याबद्दल आ. जगताप यांच्या हस्ते डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, २0१९-२० मध्ये जिल्हा शासकीय रक्तपेढीने सात हजार रक्त पिशव्यांचे कलेक्शन केले.

तसेच कोरोना संसर्गाच्या काळातही सुमारे साडे चार हजार रक्त पिशव्यांचे संकलन केले. कोरोना काळात सिव्हिल हॉस्पिटलपासून सर्वसामान्य माणूस जाणेही टाळत होता. तरीसुद्धा नागरिकांमध्ये जनजागृती करून रक्तसंकलन करण्याचे काम करुन ते गरजू रुग्णापंर्यंत रक्त पिशव्या पोहचविण्याचे काम केले.

त्यामुळे निती आयोगाचा जिल्हा शासकीय रक्तपेढीला प्रथम मानांकन मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडल्याचे देखील आ. जगताप यावेळी म्हणाले. यावेळी रक्तपेढीतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सुनील पोखरणा म्हणाले की, सर्व रुग्णांपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू आहे.

रक्तपेढील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळेच आपल्याला आरोग्य क्षेत्रातील चांगला बहुमान मिळालेला आहे. असेच काम सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावे. जिल्ह्याचे नाव सर्वदूर पोहचेल.

अहमदनगर लाईव्ह 24