Swott Neckon -102 : मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार ‘हा’ नेकबँड, सिंगल चार्जमध्ये चालेल 40 तास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Swott Neckon -102 : जबरदस्त आवाज आणि फीचर्समुळे अनेकजण इयरफोन किंवा इयरबड्सना पसंती देत आहेत. त्याचबरोबर त्यांना बाळगणे सोयीस्कर आहे. त्यामुळे सध्या त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे आपण पाहतो.

भारतीय बाजारात महागड्यापासून ते स्वस्तात मिळणारे इयरफोन आहेत. तुम्ही जर नेकबँड घेण्याचा विचार करत असाल तर नुकताच Neckon -102 हा नेकबँड लाँच झाला आहे.

मिळणार एचडी स्टिरिओ साउंड

लाँच केलेल्या Neckon -102 या ब्लूटूथ नेकबँड 10mm ड्रायव्हर्स आणि 45ms लो लेटेंसी गेमिंग मोडमुळे समृद्ध बास आणि इमर्सिव्ह एचडी स्टिरिओ साउंड मिळतो. त्यामुळे गेमिंग अनुभव जबरदस्त होतो. हा ब्लूटूथ सिलिकॉनपासून बनवला असून तो तुम्ही दीर्घकाळ वापरू शकता. त्याशिवाय व्यायाम, जॉगिंग, धावण्यासाठीही त्याचा फायदा होतो.

सिंगल चार्जवर 40 तास चालेल

हा ब्लूटूथ सिंगल चार्जवर 40 तासांपर्यंत टिकू शकतो. तसेच तो ब्लूटूथ नेकबँड व्हॉइस असिस्टंट (गुगल असिस्टंट आणि सिरी) या दोन्हींसोबत काम करेल. स्मार्टफोनचा वापर न करता सहजपणे तुम्ही संगीत नेव्हिगेट करणे, कॉल करणे, कॉल घेण्यास अनुमती देतो.

ड्युअल पेअरिंग

अर्गोनॉमिक डिझाइन आणि सक्रिय आवाज रद्द करण्यासारख्या फीचर्समुळे तुम्हाला संगीताचा चांगला अनुभव मिळेल. त्याचबरोबर मॅग्नेटिक मेटल इयरबड्स आणि उर्जा-कार्यक्षम 5.0 ब्लूटूथ फीचर्ससह ड्युअल पेअरिंग फीचर्समुळे तुम्हाला एकाच वेळी दोन वेगवेगळे डिव्हाइस जोडता येईल.