देवरेंच्या समर्थनार्थ ‘या’ संघटना आज राज्यव्यापी आंदोलन करणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्यामुळे आणि कुचंबणा होत असल्यामुळे आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

त्यांच्या या ऑडिओ क्लिपमुळे सध्या सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे, पण दरदिवशी या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट येतो आहे. नुकतेच याप्रकरण सुरु असताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे यांचा एक अहवाल सादर केला होता. तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्धच्या अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या अवालात गंभीर आरोप करण्यात आले असून हा अहवाल दबावाखाली तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अहवालानुसार ज्योती देवरे यांच्याविरोधात कामात अनियमितता आढळली आहे. यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मात्र हा अहवाल आता वादाच्या भोवऱ्यात आढळला असून या अहवालावर शंका उपस्थित होत आहेत. याच अहवालाच्या विरोधात आता राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून महिला अधिकाऱ्यांवर होणाऱ्या त्रासाचा निषेध केला आहे.

यामुळे या अहवालाची चौकशी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडून करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी संघटनेतर्फे राज्यभर काळ्या फिती लावून आंदोलन करण्याबाबत इशारा दिला आहे.

लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली महिला अधिकाऱ्यांची कुचंबणा झाल्यास महिला अधिकाऱ्यांचे करिअर संपून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24