file photo

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातूनच राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला आहे. आगामी जामखेडची नगरपरिषद निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढविणार आहे,

अशी माहिती पक्षनिरीक्षक रामभाऊ मरगळे यांनी दिली. नगरपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची जामखेड येथे शनिवारी दुपारी बैठक झाली.

यावेळी इच्छुक उमेदवार, नेते, कार्यकर्ते यांची मते यावेळी जाणून घेण्यात आली. वंचितचे भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. अरुण जाधव अध्यक्षस्थानी होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, जिल्हा सचिव योगेश साठे, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव चव्हाण, ज्येष्ठ सल्लागार जीवन पारधे यांनी आपले मत व्यक्त केले.

अरुण जाधव यांच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या २१ जागा स्वबळावर लढविण्याची यावेळी घोषणा करण्यात आली. अरूण जाधव म्हणाले, वंचित समूहाला सत्तेत बसविण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर अहोरात्र झटत आहेत.

याचा वंचित समूहाने विचार करावा. वंचित बहुजन आघाडी शिवाय सत्तेचे समीकरण बसणार नाही हे प्रस्थापितांनी लक्षात घ्यावे, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.