BSNL Prepaid Plans under 100 Rupees : Jio-Airtel ला टक्कर देतात ‘हे’ प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळतात अनेक फायदे; किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी

BSNL Prepaid Plans under 100 Rupees : देशातील भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल ही सर्वात मोठी सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे सर्व प्लॅन Jio,Airtel आणि Vodafone Idea ला टक्कर देतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारण या कंपनीचे सर्व प्लॅन हे ग्राहकांना परवडणारे असतात. जाणून घेऊयात कंपनीच्या अशाच काही प्रीपेड प्लॅनबद्दल ज्याची किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी आहे.

BSNL रिचार्ज प्लॅन

Advertisement

1. 18 रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या 18 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता केवळ 2 दिवस इतकी आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 1 जीबी डेटा मिळतो. त्याशिवाय उपलब्ध डेटा संपल्यानंतर, स्पीड 80Kbps पर्यंत कमी होतो.

2.75 रुपयांचा प्लॅन

Advertisement

कंपनीच्या 75 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 मिनिटे व्हॉईस कॉलची सुविधा आहे. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये एकूण 2 जीबी डेटा मिळतो.

3. 87 रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या 87 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 14 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल, दररोज १ जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात. त्याचबरोबर या ग्राहकांना या प्लॅनमध्ये हार्डी मोबाइल गेम्स सेवेचा लाभ मिळतो.

Advertisement

4. 99 रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या च्या 99 रुपयांच्या या प्लॅनची ​​वैधता 18 दिवसांची असून यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांना मोफत कॉलर ट्यून देण्यात आली आहे.

बीएसएनएलचे सर्व प्रीपेड प्लॅन हे 18 रुपयांपासून सुरू होतात. कंपनीच्या काही प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग ऑफर केली जाते. त्याशिवाय काही जबरदस्त फायदेही दिले जातात.

Advertisement

त्यामुळे देशभरात या कंपनीचे लाखो ग्राहक आहेत. त्याशिवाय कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत परवडणारे प्लॅन घेऊन असते.