BSNL : एअरटेल, जिओ आणि Vodafone Idea या खासगी मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांनी त्यांच्या प्लॅनच्या किंमतींमध्ये मध्ये वाढ केली आहे. असे जरी असले तरी सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये फारसा बदल केला नाही.
त्यामुळे ही कंपनी इतर कंपन्यांना टक्कर देत आहे. याच कंपनीच्या 599 रुपयांच्या रिचार्जवर दररोज 5 GB डेटा मिळत आहे. तसेच डेटासोबतच इतर फायदेही उपलब्ध आहे.
या प्लॅनची किंमत 599 रुपये आहे. जर तुम्ही हा रिचार्ज केला तर तुम्हाला एकूण 84 दिवसांची वैधता मिळत आहे.
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 5GB डेटा मिळतो. जर तुम्ही भरपूर इंटरनेट वापरत असाल तर तुमच्यासाठी हा प्लॅन फायद्याचा ठरू शकतो.
तसेच तुम्हाला या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग,दररोज एसएमएस सुविधा कंपनी देत आहे.
जर तुम्ही 84 दिवसांच्या वैधतेसह येणारा एखादा प्लॅन शोधत असाल तर तुम्ही या रिचार्ज करू शकता.