अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतरही नागरिकांना विविध समस्या जाणावताना दिसून येथे आहेत. नुकतच कोरोनाची लस घेतलेल्या तरुणांमध्ये काही समस्या जाणवत असल्याने चिंतेत पुन्हा भर पडली आहे.
तरुणांमध्ये आणि लहान मुलांमध्ये लसीकरणानंतर हृदयावर सूज येत असल्याचे पाहायला मिळाले आहे.याबाबत यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन अभ्यास करत आहे.
या मुद्द्यावर पुढेही अभ्यास करणार असल्याचे सीडीसीने म्हटले आहे. १७ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात सीडीसीने म्हटले आहे, की अनेक तरुणांमध्ये लस घेतल्यानंतर मायोकार्डिटिसची समस्या जाणवली आहे. ही समस्या स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक जाणवत आहे.
मायोकार्डिटिसचा अर्थ आहे, हृदयाच्या मांसपेशींमध्ये सूज येणे. बहुदा ही समस्या उपचारांशिवायच बरी होते. सीडीसीने म्हटले की या समस्येसाठी अनेक प्रकारचे व्हायरस कारणीभूत असू शकतात.
या समस्येची जास्त प्रकरणे आढळली नसली तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांनी याबाबत सतर्क राहाणे गरजेचे आहे. नेमकी किती लोकांना ही समस्या जाणवली आहे, याबाबतचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. याबाबत सध्या तपास सुरू आहे.
सीडीसीच्या म्हणण्यानुसार, बहुतेक प्रकरणं ही MRNA लस (मॉडर्ना आणि फाइजर) घेतल्यानंतर चार दिवसांनी समोर आली आहेत. याआधी इस्रायलच्या (Israel) आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते, की फाइजर लस घेणाऱ्यांमध्ये हृदयावर सूज येत असल्याची समस्या अधिक आहे.