अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- लोकप्रिय मराठी मनोरंजन वाहिनी असलेल्या झी मराठीवर सध्या अनेक मालिका सुरू आहेत. पण काही मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘अग्गबाई सूनबाई’ काहीच महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. मालिकेची सुरुवात अतिशय दमदार झाली होती.
तर आता मालिकेला वेगळं वळण मिळालं होतं पण आता मालिका बंद होणार असल्याचं समोर येत आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेचं पुढील पर्व ‘अग्गबाई सूनबाई’ हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं.
पण अवघ्या चारच महिन्यात ही मालिका गुंडाळावी लागत आहे. पहिलं पर्व हे सासूबाई वर आधारित होतं तर दुसरं पर्व हे सूनबाई वर आधारित आहे.
या पर्वात आसावरी म्हणजेच शुभ्राची सासू तिला साथ देत आहे असं दाखवण्यात आलं होतं तर आता ती शुभ्राला सोहमला सोडून जाण्यासाठी ही मदत करत आहे.
पण लवकरच मालिकेचं शूटिंग पूर्ण होणार असून मालिका बंद होणार आहे. या महिना अखेरीस मालिकेचं चित्रीकरण पूर्ण होणार आहे. मालिकेची कथा आता लवकरात लवकर पुढे सरकताना दिसत आहे.