ताज्या बातम्या

Xiaomi Smartphone : 6000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतोय ‘हा’ स्मार्टफोन, सोबत महागडा इयरफोनही मिळतोय मोफत

Published by
Ahmednagarlive24 Office

Xiaomi Smartphone : चीनी टेक कंपनी Xiaomi आपले सतत नवनवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये आणत असते. सर्वच स्मार्टफोनमध्ये कंपनी जबरदस्त फीचर्स देत असल्यामुळे हे स्मार्टफोन मार्केटमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत असतात. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला Redmi A1 हा स्मार्टफोन लाँच केला होता.

कंपनीचा हा बजेट फोन असून तुम्ही तो आता खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. ही शानदार सवलत ग्राहकांसाठी Amazon वर उपलब्ध आहे. तसेच मोठ्या सूट व्यतिरिक्त, महाग इयरफोन यावर मोफत मिळत आहे. जाणून घेऊयात या ऑफरबद्दल

रेडमीच्या Redmi A1 या स्मार्टफोन तुम्ही Amazon वर स्वस्तात खरेदी करू शकता. कारण यावर मोठी सूट आणि एक खास ऑफर दिली जात आहे. फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त, हा स्मार्टफोन बँक कार्ड ऑफर आणि अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंटसह खरेदी करू शकता. जर ग्राहकांना हवे असेल तर ते हा फोन विनाखर्च EMI वर खरेदी करता येईल.

अशी मिळत आहे सवलत

Redmi A1 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये इतकी आहे. जर स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर यात 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज कंपनीने दिले आहे. हा फोन Amazon वर 37% डिस्काउंट नंतर 5699 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच जर तुम्ही HSBC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर 250 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळेल.

इतकेच नाही तर जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला 5,400 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. तसेच या फोनसोबत 699 रुपये किमतीचे वायर्ड इअरफोनही मोफत मिळत आहेत. लाइट ब्लू, ब्लॅक आणि लाइट ग्रीन अशा ३ कलर पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येईल.

मिळत आहे जबरदस्त फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा HD + LCD स्क्रॅच प्रतिरोधक डिस्प्ले आहे. हे MediaTek Helio A22 प्रोसेसर द्वारे समर्थित आहे तसेच 2GB LPDDR4x RAM आणि 32GB अंतर्गत स्टोरेज आहे जे समर्पित SD कार्ड स्लॉटद्वारे 512GB पर्यंत वाढवता येते.

याच्या कॅमेरा फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास याच्या मागील पॅनल वर 8MP डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनला 5000mAh बॅटरीचे समर्थन आहे तो बॉक्समध्येच 10W चार्जरसह येतो.

Ahmednagarlive24 Office