Xiaomi MIUI 14 : जबरदस्त फीचर्ससह येणार ‘हा’ स्मार्टफोन, बोलून होणार कागदपत्रे स्कॅन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Xiaomi MIUI 14 : कमी कालावधीतच Xiaomi या कंपनीने मार्केटमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या बऱ्याच स्मार्टफोन्सला भारतीय बाजारात खूप मागणी आहे.

कंपनीने मागच्या वर्षी MIUI 12.5 ही आवृत्ती लॉन्च केली होती. अशातच आता कंपनीने MIUI 14 सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने अतिशय भन्नाट फीचर्स दिली आहेत.

काय असणार खासियत

कंपनीने गेल्या वर्षीच MIUI 12.5 आवृत्ती लॉन्च केली होती, परंतु आता कंपनी MIUI 13 आवृत्ती लॉन्च करण्याऐवजी थेट MIUI 14 आवृत्ती लॉन्च बाजारात आणली आहे. नवीन UI सह, कार्यक्षमतेसह डिझाइनमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन UI MIUI फोटॉन इंजिनद्वारे समर्थित असून ते Android कर्नलवर चालते.

कंपनीने नवीन UI सह सिस्टम मेमरी फूटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी केले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता पूर्वीपेक्षा कमी प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स मिळतील यामध्ये असे 8 अॅप्स आहेत जे अनइंस्टॉल करता येत नाहीत.

MIUI 14 सह सिस्टम फ्लोमध्ये 60 टक्के सुधारणा करण्यात आली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नवीन UI सह आयकॉन आणि व्हिज्युअलमध्येही बदल केला जाईल. तुम्हाला आता अधिक कस्टमायझेशन मिळेल. तुम्हाला आता पाहिजे तसा आयकॉनचा आकार वाढवू किंवा कमी करून त्याची रचना बदलू शकता.

त्याचबरोबर यामध्ये फर्मवेअर आकार कमी केला आहे, जो फोनमध्ये कमी स्टोरेज कव्हर करून जबरदस्त कामगिरी देतो. अॅप क्लीनिंग फीचरच्या मदतीने अॅप कॉम्प्रेसही करता येते. याशिवाय यामध्ये नोटिफिकेशन मॅनेजमेंटमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत.

या नवीन UI सह AI फीचर समाविष्ट करण्यात आली आहेत,म्हणजेच UI च्या मदतीने फोटोंमधून मजकूर काढणे. व्हॉइस असिस्टंटमध्ये सुधारणा करणे. व्हॉइस कमांडद्वारे, तुम्ही आता कागदपत्रे स्कॅन करणे, भाषांतर करणे, स्पॅम कॉल फिल्टर करणे यासारख्या गोष्टी करता येईल.

या स्मार्टफोन्समध्ये असेल MIUI 14 अपडेट

कंपनीने अद्याप MIUI 14 ला सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी जाहीर केली नाही. Xiaomi Mi 11 Series, Xiaomi Mi 10 Series, Redmi Note 9 Series, Xiaomi Mi MIX 4, Mi 10 Series, Redmi Note 11, Redmi Note 10, Redmi K50, Redmi K40 आणि Redmi K30 त्याशिवाय इतर स्मार्टफोन्सचे संपूर्ण होस्ट मिळतात. MIUI 14 अपडेट लवकरच आढळतील.