महाराष्ट्रात वेगाने फोफावणाऱ्या कोरोनाला आवरण्यासाठी उचलले ‘हे’ पाऊल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते संक्रमण हे आता राज्यासह केंद्र सरकारचीही चिंता वाढवत आहे. त्यामुळे कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी आता केंद्र सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.

महाराष्ट्रात वेगाने फोफावणाऱ्या कोरोनाला आवरण्यासाठी केंद्राने एक उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. ही समिती आता राज्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रावर परत एकदा कोरोनाचे संकट गडद होत आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून ती संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. ही वाढती आकडेवारी पाहता सरकारने वेळीच खबरदारीची पावले उचलण्यास सुरूवात केली असून,

विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्याचसोबत आगामी आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊन बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकजणाला आता काळजी घ्यावी लागणार आहे.

अन्यथा परत एकदा सरकार कठोर पावले उचलू शकते. राज्यात आज ८ हजार ६२३ कोरोना बाधितांची वाढ झाली असून काल पेक्षा कोरोनावर  मात करणाऱ्या रूग्णांची संख्या देखील घटली आहे.

परिणामी दिवसभरात ३ हजार ६४८ रुग्ण हे बरे झाले आहेत. एकूण २० लाख २० हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या काही दिवसांमध्ये रोज आठ हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. ही संख्या सर्वांचीच काळजी वाढवणारी आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24