‘या’ महासत्तेने दिले कोरोनाकाळात भारताला मदत करण्याची ग्वाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी करोनाशी लढण्यासाठी भारताला आणि भारतीयांना वैद्यकीय साहित्यासोबतच सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी ट्विट केले, त्यात त्यांनी म्हटले आहे की, ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेला कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती असताना मदत केली

त्याचप्रमाणे आम्ही भारताला गरज असताना मदत करण्याचं ठरवलं आहे, असं म्हटलं. आपला सहकारी भारताला मदत देण्यास उशीर करत असल्याने भारतीय अमेरिकी तसंच पक्षातील काही सहकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

अमेरिकेनं भारताला लसी निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचं मान्य केलं आहे. बायडेन प्रशासनाकडून भारताला ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली.

दरम्यान,े अमेरिकेने कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याची ग्वाही दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. जर्मनी, फ्रान्, इंग्लंड तसंच अनके देश मदतीसाठी पुढे सरसावत आहेत.

यानंतर अमेरिकेनेही भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं असून दोन्ही देशांमधील स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. तसंच मदतीचं आश्वासन दिल्याबद्दल आपण जो बायडन यांचे आभार मानल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

जो बायडन यांच्याबरोबरील चर्चा फलद्रुप झाली. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या करोना स्थितीवर आम्ही चर्चा केली. अमेरिकेकडून भारताला देण्यात आलेल्या सहकार्याबद्दल मी जो बायडन यांचे आभार मानले,” असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अमेरिकेकडून भारताला व्हेंटिलेटर, कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल तसंच इतर साधनसामग्री पुरवली जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना विनंती केली होती.

त्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेना भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लस निर्मितीची अडचण दूर होणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24