जिल्ह्यातील या तालुक्याने कोरोनाला हरवले ! इतकी गावे झाली कोरोनामुक्त !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भयभीत झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांचा कोरोनाच्या विळख्यातून सुटका झाल्याने या गावातील लोक आता मोकळा श्‍वास घेत आहेत.

तालुक्यातील ५५ गावांपैकी ३९ गावे कोरोनामुक्त झाले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात ५५ गावे असून ५२ ग्रामपंचायती आहेत. सर्व ग्रामपंचायतींनी कोरोनामुक्त होण्याचा संकल्प केला होता.

यामधील ३८ ग्रामपंचायती असलेल्या ३९ गावांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका झाली असून या गावात अलीकडच्या काळात एकही रुग्ण सापडला नाही.

कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये भामाठाण, ब्राम्हणगाव वेताळ, दिघी, एकलहरे, घुमनदेव, गोंडेगाव, गुजरवाडी, जाफराबाद, कडीतबु, कमालपूर, कान्हेगाव, खंडाळा, खिर्डी, खोकर, कुरणपूर, लाडगाव, माळेवाडी, मालुंजा, माळवडगाव, मांडवे, निमगाव खैरी, सराला,

उंदिरगाव, वांगी बुद्रूक, वांगी खुर्द, कडीत खुर्द, मातुलठाण, मुठेवाडगाव, नाऊर, मांडवे, भैरवनाथनगर, दत्तनगर, मालुंजा बुद्रूक, खानापूर, हरेगाव, फत्याबाद, गळनिंब, महांकाळ वडगाव आदी गावांचा सामावेश आहे.

सध्या तालुक्यात रोज सरासरी १५ ते २० रुग्ण सापडतात. तालुक्यात सरासरी एक हजारपेक्षा जास्त कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्यांची संख्या पाहता रुग्ण सापडण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

त्यामुळे तालुक्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे तालुका आरोग्यअधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण सापडतात, त्या गावांमध्ये प्रभावी उपाययोजना सुरू आहेत.

ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंटवर भर दिला जात आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी केल्यास श्रीरामपूर तालुका कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24