ताज्या बातम्या

असा होता यंदाच्या वर्षातील सेन्सेक्सचा 61 हजारांपर्यंतचा प्रवास

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. 24 मार्च 2020 रोजी शेअर बाजार 25 हजार 638.90 या नीचांकी पातळीवर होता पण त्यानंतर निर्बंध हळूहळू हटले गेले अन शेअर बाजाराचा निर्देशांक शिखरावर पोहोचला.(Sensex)

देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने यंदा 47 हजार ते 61 हजारांचा प्रवास पूर्ण केला. पण सेन्सेक्सला 40 हजार ते 50 हजाराच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 21 महिने लागले होते, मात्र या वर्षात इतकी गुंतवणूक झाली की सेन्सेक्सने अवघ्या 8 महिन्यांत 50 हजार ते 60 हजारांचा टप्पा पार केला.

48 हजार : गेल्या वर्षीच्या 4 जानेवारीला सेन्सेक्सने 48 हजारांची पातळी ओलांडून 48 हजार 176.80 च्या पातळीवर बंद झाला.

49 हजार : सेन्सेक्सने 11 जानेवारीला 49 हजारांची पातळी ओलांडली आणि 49 हजार 269.32 वर स्थिरावला.

50 हजार : 3 फेब्रुवारीला प्रथमच 50 हजारांच्या पुढे गेला होता आणि 50 हजार 255.75 वर बंद झाला होता.

51 हजार : फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्सने 51 हजाराचा टप्पा पार करून 51,348.77 वर बंद झाला.

52 हजार : 15 फेब्रुवारीला सेन्सेक्स 52 हजार 154.13 वर त्याने उसळी घेतली

53 हजार : दोन महिन्यांत सेन्सेक्सने 48 हजार ते 52 हजारांचा टप्पा ओलांडला होता, मात्र त्यानंतर सेन्सेक्सला पुढचा महत्त्वाचा टप्पा ओलांडायला 5 महिने लागले. 7 जुलै रोजी सेन्सेक्सने 53 हजारांची पातळी ओलांडली.

54 हजार : 4 ऑगस्ट 2021 रोजी सेन्सेक्स 54 हजारांवर पोहोचल्यानंतर प्रथमच 54 हजार 369.77 वर बंद झाला

. 55 हजार : 13 ऑगस्ट रोजी सेन्सेक्सने 55 हजारांची पातळी ओलांडून 55,437.29 वर बंद झाला.

56 हजार : 27 ऑगस्ट रोजी सेन्सेक्सने 56 हजारांची पातळी ओलांडली आणि 56,124.72 वर बंद झाला होता.

57 हजार : सेन्सेक्सने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्याने 57 हजारांचा स्तर ओलांडला.

31 ऑगस्ट रोजी तो 57,552.39 वर बंद झाला.

58 हजार : सेन्सेक्सने 3 सप्टेंबरला तो 58 हजारांची पातळी ओलांडून 58129.95 वर बंद झाला.

59 हजार : देशांतर्गत सेन्सेक्सने 16 सप्टेंबर रोजी तो 59,141.16 वर बंद झाला.

60 हजार : सेन्सेक्सने यावर्षी सप्टेंबरमध्ये 60 हजारांचा टप्पा पार केला. 24 सप्टेंबर रोजी सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा ओलांडून 60,048.47 वर बंद केला होता.

61 हजार : 60 हजारांची महत्त्वाची पातळी ओलांडल्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा सेन्सेक्स 61,305.95 वर बंद झाला. कोरोना महामारीमुळे झालेली घसरण आणि त्यानंतर सुरू झालेले आर्थिक विकासाचं चक्र यामुळे शेअर बाजारातली वाढलेली गुंतवणूक यामुळे अनेक अर्थांनी 2021 वर्ष शेअर बाजारासाठी महत्त्वाची ठरलं

Ahmednagarlive24 Office