ताज्या बातम्या

‘या’ वेब सिरीज तुमचा वेळ वाया घालवतील; चुकूनही पाहू नका

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोरोना काळात जेव्हा सिनेमे प्रदर्शित होत नव्हते. तेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक अशा सीरिज आहेत.

ज्यांचा पहिला भाग पाहिल्यानंतर दुसरा भाग पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचते. मात्र आज आम्ही तुम्हाला काही अशा सीरिज बाबत सांगणार आहोत ज्या पाहिल्यानंतर तुमचा वेळ फुकट वाया गेल्याची भावना मनात येईल

‘द एपांयर’:-  सीरिजमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची मेजवानी एकत्र पाहायला मिळाली. मात्र सीरिज प्रमाणापेक्षा अधिक स्लो आहे. त्यामुळे पहिला एपिसोड पाहिल्यानंतर दुसरा एपिसोड पाहाण्याची इच्छा होणार नाही.

‘ओके कंप्यूटर’:-  या सीरिजची कथा 9 – 10 वर्षांनंतरची आहे. सीरिजमध्ये क्राईम दाखवण्यात आला आहे. म्हणून सीरिज पाहण्यात वेळ वाया घालवू नका.

मैं हीरो बोल रहा हूं’:-

  नावाप्रमाणेच ही वेब सिरीज एका छोट्या शहरातील मुलावर आधारित आहे. या मुलाला मुंबईचा डॉन बनायचे आहे, असं वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे.

‘बिसात: खेल शतरंज का’:-  वेब सिरीजची कथा मनोचिकित्सक कियाना वर्माची आहे जिचे लग्न अभिजीत नावाच्या डॉक्टरशी होते. पण कियाना तिच्या पेशंटसोबत इतकी भावूक होते की तिच्याच जीवावर परिणाम होतो.

Ahmednagarlive24 Office