अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- करोनाचा वाढता संसर्गाची साथसाखळी तोडण्यासाठी प्रशासनाने अनेक कठोर पाऊले उचलली आहे.
यातच आता अत्यंत महत्वपूर्ण कामानिमित्त जिल्ह्याबाहेर प्रवास करायचा असले तर त्यापूवी तुम्हाला ई- पास आवश्यक आहे.
कारण आता या ई – पास शिवाय तुम्हाला जिल्ह्याबाहेर प्रवास करता येणार नाही आहे. जिल्हाबाहेर जाण्यासाठी या ई-पासचा उपयोग होणार आहे. पोलीस प्रशासनाने ई-पास सुविधा उपलब्ध केली आहे.
ज्या नागरिकांना अत्यंत महत्वाच्या (वैद्यकीय कारण/अत्यावश्यक सेवा/अंत्यविधी) कामानिमित्त घरातून बाहेर व इतर जिल्हाबाहेर जाण्यासाठी https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जावून आपला फोटो अपलोड करुन अर्ज करावा.
तसेच अर्ज करताना घराबाहेर जाण्याच्या कारणासह संबंधित कागदपत्रे जोडावे लागणार असल्याचे अहमदनगर जिल्हा पोलिस दलातर्फे बजावले आहे.
ई-पास मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळालेला सांकेतिक क्रमांक जतन करून ठेवावा.
तसेच सदर संकेतस्थळावर पुन्हा जावून आपला सांकेतिक क्रमांक टाकून ई-पास प्राप्त करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.