सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची ही इच्छा राहिली अपूर्ण!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- भिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीमुळे सिनेमा आणि टीव्ही सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थचे जाणे त्याच्या कुटुंबियांबरोबरच चाहत्यांनाही चटका लावणार आहे.

सिद्धार्थने ‘बालिका वधू’ मालिकेत शिव ही भूमिका साकारली होती. बालिका वधू आणि बिग बॉस १३ विजेतपद मिळवल्यानंतर सिद्धार्थ लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता.

याच बिग बॉसच्या घरामध्ये त्याची भेट शहनाज गिलशी झाली. या कार्यक्रमावेळी हे दोघेजण एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली.

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा होता. केवळ ४० व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

काही महिन्यांपासून अशी चर्चा रंगली होती की, तो त्याची जवळची मैत्रीण शहनाज गिलबरोबर लग्न करणार होता. सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलमधील असलेला बॉण्ड हा ‘बिग बॉस १३’ च्या घरात असल्या पासूनचा होता.

‘बिग बॉस’ व्यतिरिक्त या दोघांनी दोन म्युझीक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी ते दोघं ‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘डान्स दिवाने’या दोन शो मध्ये स्पेशल जज म्हणून गेले होते.

त्या दोघांनी लग्न करावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. ते दोघे कपल असले नसले तरी ते लवकरच लग्न करमार असल्याच्या बातम्या पसरत होत्या. अनेकदा त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं.

सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती.

त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडत होती.

शहनाज गिल बिग बॉसमध्ये सिद्धार्थ शुक्लासोबत असायची. दोघांनीही बिग बॉस 13 मध्ये बराच वेळ एकत्र घालवला होता. यामुळे दोघांची मैत्री खूप घट्ट झाली.

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला ते शो मध्ये एकमेकांची काळजी घेत असत. दोघांची जोडी प्रेक्षकांनाही आवडली आणि दोघांना प्रेक्षकांनी ‘सिदनाज’ ही पदवी दिली होती.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –

 

अहमदनगर लाईव्ह 24