अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- शिर्डी शहरात स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीच्या मदतीसाठी असलेल्या गंगुबाई गंगाराम गायकवाड यांनी निसर्गावरील प्रेमापोटी स्मशानभूमीचा परीसर हिरव्या वनराईने बहरविला आहे.
अंत्यविधीसंस्कार जबाबदारी पार पाडताना गंगुबाईंनी झाडे लावा झाडे जगवाचा बहुमोल संदेश आपल्या कृतीमधून समाजाला दिला आहे. शिर्डी शहरातील नगर पंचायतच्या स्मशानभूमीत पवार कुटुंब राहते.
पगार जरी गंगुबाई यांना मिळत असला तरी त्यांचा पती व मुलगा देखील कामात मदत करतो. झाडे लावा झाडे जगवाचे शासन आवाहन करत असले तरी त्यांचे अनुकरण करणारे माणस फार कमी आहेत.
गंगुबाई याला अपवाद ठरल्या. नगरपंचायतीने येथे पंचवीस विविध झाडे लावली होती. त्यांना नियमित पणे पाणी टाकून काळजी घेतल्याने ही झाडे आता दहा-बारा फूट उंचीची झाली आहे. हिरवाईने नटलेला परिसर, स्वच्छ सुंदर,असे वातावरण स्मशानभूमीत तयार झाले आहे.
कष्टावर गंगुबाईंची श्रद्धा आहे. त्यांचा मुलगा विष्णू उच्चशिक्षण घेत आहे. आज ना उद्या परीस्थिती बदलेल,अहमदनगर जिल्ह्यातील ह्या महिलेने स्मशानभूमीत फुलविली वनराई !
शिर्डी शहरात स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीच्या मदतीसाठी असलेल्या गंगुबाई गंगाराम गायकवाड यांनी निसर्गावरील प्रेमापोटी स्मशानभूमीचा परीसर हिरव्या वनराईने बहरविला आहे.
अंत्यविधीसंस्कार जबाबदारी पार पाडताना गंगुबाईंनी झाडे लावा झाडे जगवाचा बहुमोल संदेश आपल्या कृतीमधून समाजाला दिला आहे. शिर्डी शहरातील नगर पंचायतच्या स्मशानभूमीत पवार कुटुंब राहते.
पगार जरी गंगुबाई यांना मिळत असला तरी त्यांचा पती व मुलगा देखील कामात मदत करतो.
झाडे लावा झाडे जगवाचे शासन आवाहन करत असले तरी त्यांचे अनुकरण करणारे माणस फार कमी आहेत. गंगुबाई याला अपवाद ठरल्या. नगरपंचायतीने येथे पंचवीस विविध झाडे लावली होती.
त्यांना नियमित पणे पाणी टाकून काळजी घेतल्याने ही झाडे आता दहा-बारा फूट उंचीची झाली आहे. हिरवाईने नटलेला परिसर, स्वच्छ सुंदर,असे वातावरण स्मशानभूमीत तयार झाले आहे. कष्टावर गंगुबाईंची श्रद्धा आहे.
त्यांचा मुलगा विष्णू उच्चशिक्षण घेत आहे. आज ना उद्या परीस्थिती बदलेल, यावर त्यांचा विश्वास आहे.
झाडे मोठी करण्यात मिळालेले समाधान पैशापेक्षा मोठे आहे,असे गंगुबाई शेवटी म्हणाल्या.. यावर त्यांचा विश्वास आहे.झाडे मोठी करण्यात मिळालेले समाधान पैशापेक्षा मोठे आहे,असे गंगुबाई शेवटी म्हणाल्या.