अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- राज्यात आज आघाडी सरकार आहे. हे सरकार स्थापन करण्यात बाळासाहेब थोरात यांचेही योगदान नाकारता येणार नाही, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे नेते बाळासाहेब भुजबळ यांनी केले.
महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे महसूल मंत्री आणि नगर जिल्ह्याचे सुपूत्र ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचा सोहळा शहर काँग्रेसच्या तांगेगल्ली संपर्क कार्यालयात सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी भुजबळ बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेेवक रुपसिंग कदम होते. राज्यातील राजकारणात बाळासाहेब थोरात आजही नेते आहेत.
त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत विरोधी काँग्रेसला सत्तेत स्थान प्राप्त झाले. पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी गती देण्याचे काम नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करतील, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.