त्या ११ जणांची अखेर मनपात नियुक्ती !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- मनपात ११ जणांना अनुकंपा तत्‍वावर गट ड संवर्गात नियुक्ती देण्यात आली. महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी हे नियुक्ती पत्र दिले.

या उमेदवारांनी अनुकंपांतर्गत नियुक्ती मिळावी, यासाठी मनपाकडे अर्ज सादर केले होते. सभागृह नेते रविंद्र बारस्कर, नगरसेवक मनोज दुलम, अजय चितळे, आस्थापना प्रमुख अशोक साबळे, राजेश लयचेट्टी,

किशोर कानडे, पुष्कर कुलकर्णी, नीलेश जाधव, शुभम वाकळे, शिवा आढाव आदी उपस्थित होते. वाकळे म्हणाले, अनुकंपातर्गत नियुक्तीसाठी दाखल प्रस्तावांना गती देवून मनपा सेवेत नियुक्ती पत्र देण्यात आले.

कर्मचाऱ्यांनी मनपाचे हित जोपासावे तसेच नियमीत व वेळेत ना‍गरिकांचे प्रश्न मार्गी लावावे. सरकारी विभागात कर्मचारी भरती होत नाही.

अनुकंपा तत्त्वानुसार गट क व ड मध्ये नेमणुका केल्या जातात, असे वाकळे यांनी सांगितले.

विजयालक्ष्मी सातपुते, राजेंद्र फुलारी, विश्वास तिजोरे, शिवाजी गाढवे, कोमल बिल्लावार, जयश्री कोतकर, सोहेल शेख, अनिल शिंदे, वृषाली बहिरवाडे, गणेश औशीकर, सत्यम बांभळ यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24