‘त्या’ शेतकऱ्यांचे एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :-  सातबारा उताऱ्यांवरील शासनाचे शिक्के कमी करण्याची मागणीसाठी वडगाव , पिंपळगाव माळवी येथील शेतकऱ्यानी एमआयडीसी येथील कार्यालयासमोर उपोषण केले .

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी व वडगाव गुप्ता येथील नियोजित औद्योगिक क्षेत्र विस्तारीकरणासाठी भूसंपादनास येथील बाधित शेतकर्यांचा मागील दहा वर्षांपासून तीव्र विरोध आहे.

येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासनाच्या संबंधित विभागास निवेदन देऊन त्यांच्या केली.परंतु त्यांच्या या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे.

या परिसरातील शेतकरी अगोदरच अल्पभूधारक असून त्यांच्या बऱ्याच शेतजमिनी एमआयडीसीमध्ये गेलेल्या आहेत. परिसरातील जमीन बागायती असल्यामुळे शेतकऱ्यांनी या भूसंपादनास विरोध केला आहे.

शासनाने त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील शिक्के काढण्यासाठी बुधवार अठरा ऑगस्ट रोजी औद्योगिक महामंडळाच्या एमआयडीसी येथील कार्यालयासमोर पिंपळगाव माळवी, वडगाव गुप्ता येथील शेतकर्यांनी लाक्षणिक उपोषण केले.

बाधित शेतकऱ्यांचा सातबारा उताऱ्यावर शासनाचे नाव लागल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही व कुठलीही बँक कर्ज देत नाही,

त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी शेतकरी बचाव कृती समितीचे प्रकाश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकर्यांनी लाक्षणिक उपोषण केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24