त्या बाप – लेकांनी मुंबईच्या व्यापाऱ्याला कोट्यवधींचा गंडा घातला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मुंबई येथील डायमंड, सोने चांदी व्यापाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील सराफ व्यापारी असलेल्या बाप लेकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाळासाहेब विश्वनाथ डहाळे व अक्षय बाळासाहेब डहाळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत. दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील वैष्णवी अलंकार गृह नंबर 2 येथील अक्षय बाळासाहेब डहाळे व बाळासाहेब विश्वनाथ डहाळे यांनी मुंबई येथील व्यापारी दिनेश प्रकाश मेहता (वय 47, रा. विलेपार्ले, मुंबई)

यांच्याकडून सुमारे 1 कोटी 98 लाख 6 हजार रुपयांचे सुवर्णालंकार व डायमंड अलंकाराचा व्यवहार केला होता. या अलंकाराची रक्कम दिनेश मेहता यांनी अक्षय डहाळे व बाळासाहेब डहाळे यांच्याकडे मागितली असता त्यांनी दिली नाही.

उलट मेहता यांना रक्कम व अलंकार परत न करता उलट तुला जे करायचे ते कर, तुझे सोने व डायमंडचे अलंकार आम्ही देणार नाही व पैसेही देणार नाही, असे बोलून मेहता यांची रक्कम बुडवण्याच्या हेतूने मेहता यांचे सुवर्णालंकार संगनमत करून, विश्वास संपादन करून, हडपण्यासाठी फसवणूक केली.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी प्रकाश मेहता यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्या बाप लेका विरुद्ध फिर्याद दिली आहे दिली.

या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात बाळासाहेब विश्वनाथ डहाळे व अक्षय बाळासाहेब डहाळे (दोघे रा. श्रीरामपूर) याच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24