मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यामध्ये सतत टीका सत्र सुरु असते. तसेच ते एकमेकांवर आरोप करत असतात. संजय राऊत यांनी INS विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत.
संजय राऊत हे पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर चांगलेच भडकल्याचे दिसत आहे. ते म्हणाले, किरीट सोमय्या यांनी आपण आरोपी आहात हे विसरू नये. तुमच्यावरती आरोपपत्र आहे. तुम्ही जनतेच्या पैशाचा अपहार केलेला आहे.
टीव्हीसमोर येऊन मोठ्यामोठ्याने बोलल्याने तुमचे आरोप धुवून निघत नाहीत. आणि याही पेक्षा भयंकर अशी तुमची प्रकरणे समोर येणार आहेत हे लक्षात घ्या. जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात,
त्यांचे आता पितळ उघडे पडलेले आहे. तेव्हा कोणी जर काही म्हणत असेल, तर त्यांना म्हणू द्या. आरोपीच्या आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोकं विश्वास ठेवत नाहीत असे संजय राऊत म्हणाले आहेत.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, घोटाळा 58 रुपयांचा असो की 58 कोटींचा असो. गुन्हा हा गुन्हाच असतो. सोमय्यांना न्यायालयाने अजून निरपराध ठरवले नाही. मात्र, महाराष्ट्रात एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना न्यायालयात दिलासा कसा मिळतो.
महाविकास आघाडीच्या लोकांना असा दिलासा का मिळत नाही. न्यायव्यवस्थेत एका पक्षाच्या विचारांची लोक आहेत, त्यामुळे असे सुरू आहे.
आता आम्ही कोणाला कायदा शिकवायचा. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. हे पाहून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अश्रू ढाळले असते असेही राऊत म्हणाले.
आयएनएस विक्रांतच्या पैशाचा शंभर टक्के अपहार झाला आहे. आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत. ते भूमिगत झाले होते. फरार झाले होते आणि तुम्ही जर खालच्या कोर्टाचा निकाल पहाल, किंबहुना हायकोर्टातलाही निकाल पहाल.
आरोपी निर्दोष नाहीत. आरोपींची कसून चौकशी व्हायला पाहिजे. आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आरोपी उगाच जास्त वचवच करू नये.
तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीने संयम बाळगायला हवा. आरोपीने कोणत्या परिस्थितीमध्ये हा जामीन मिळवलाय याबाबत लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम असेही संजय राऊत बोलताना म्हणाले आहेत.